विष्णुदास भावे नाट्यगृह ग्रंथालय
📍 से 16 वाशी
हे वाचनालय नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आले असून नागरिकांना ज्ञान, संस्कृती आणि वाचनाची आवड वाढविण्यासाठी हे एक उत्कृष्ट केंद्र आहे. येथे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच इतर प्रादेशिक आणि परदेशी भाषांतील साहित्य, कादंबऱ्या, चरित्रग्रंथ, तांत्रिक व शैक्षणिक संदर्भातील पुस्तके उपलब्ध आहेत. वाचनालयामध्ये अत्याधुनिक संगणक प्रणाली, डिजिटल कॅटलॉग, आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे वाचकांना हवे ते पुस्तक सहज शोधता येते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका (study section) आणि नागरिकांसाठी वाचनगृहाची सोय केली आहे. वाचनालयामध्ये शांत, स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्येक भेट देणारा वाचक आपला वेळ आत्मविकासासाठी उपयोगात आणू शकतो.
Librarian: श्री.बी.एच.वाघ (ग्रंथपाल), श्रीमती अर्चना नगराळे (ग्रंथपाल), श्रीमती शर्मिली दिघे (सहाय्यक ग्रंथपाल)
Opening Hours: सकाळी ९:०० ते सायंकाळी १०:०० (सोमवार - रविवार )
No. of Copies: None